Saturday 29 April 2017

वाचावीत अशी १०० पुस्तके

@वाचावीत अशी १०० पुस्तके @
      📚✍📕📗🗞📖🗃
०१.) ययाती = वि. स. खांडेकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे
८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
१००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे...

Wednesday 12 April 2017

Marathi Mp3 books : बोलती पुस्तके ,निर्मिती. श्री.आनंद वर्तक सर

ओळख

--------------------------------------------------------------------------------

नमस्कार मंडळी!

मराठी बोलत्या पुस्तकांच्या जगात आपले हार्दिक स्वागत!

आजच्या धकाधकीच्या जगात आपल्यासारख्या "खाऊन-पिऊन सुखी" माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे फावला वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांसाठी यातली एक गोष्ट असते पुस्तकवाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार?

पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच "बोलती पुस्तकं"!

इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांच्या बोलत्या आवृत्त्या उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं यांची कथाकथनं वगळता). यासाठीच आम्ही हा बोलत्या पुस्तकांचा खटाटोप आरंभला आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. आणि आमची सर्व बोलती पुस्तकं ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत, अगदी चकट-फू! तुम्ही ती इथे ऐकू शकता किंवा "डाऊनलोड" करून तुमच्या mp3 player वर. (डावीकडे पुस्तकांच्या नावावर ’क्लिक’ करा).

आता तुम्हाला पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वैपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही पुस्तकं ऐकू शकता. (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!)

इथे (डावीकडील पुस्तक-सूची पहा) तुम्हाला काही जुनी (पहा: जुनी पु्स्तकेच का?) पण अत्यंत वाचनीय आणि मौल्यवान मराठी पुस्तके ऐकता येतील. हा उपक्रम नवा आणि सध्यातरी मोजक्याच व्यक्तींनी चालवलेला असल्याने पुस्तकांची संख्या लहान आणि वाढीचा दरही कमी आहे. पण आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या मदतीने (पहा: बोलतं पुस्तक तुमच्या आवाजात!) या दोन्हीत सुधारणा होईल अशी माझी आशा आहे.

आपल्याला हा खटाटोप आवडला, त्याला हातभार लावावासा वाटला किंवा आपले काही अभिप्राय, सुचना असतील तर कृपया मला boltipustake@gmail.com इथे ईमेल लिहुन संपर्क साधा. आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनावरच हा प्रपंच सर्वस्वी अवलंबून आहे.

कृपया facebook वर आम्हाला "like" करायला विसरू नका!

धन्यवाद,
निर्मिती. श्री.
आनंद वर्तक सर

Monday 3 April 2017

 मी, श्री. लक्ष्मण नानासाहेब मुळे, जिल्हा परिषद् उच्च प्रथिमिक शाळा बोईसर- मराठी , प्रथमिक शिक्षक आपल्या सर्वाचे हार्दिक स्वागत करतो, या  ब्लॉग मध्ये काही सुधारणा करावयाच्या आसल्यास आपण मला comments  box   मध्ये लिहून  जरूर कळवा. आपण पाहिलेल्या page la comments  box  मध्ये आपले मत आवश्य नोंदवा.
                                                                                                 लक्ष्मण मुळे 9766539771                                                                                                                                        पालघर

Saturday 1 April 2017

इयत्ता पहिली नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

इयत्ता पहिली नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  उपक्रम 

🌺 हस्त व नेत्र कौशल्य विकसनासाठी
१)टायर फिरवणे (निर्णयक्षमता विकास)
२)गादीवर कोलांट्या उड्या
३)झोका खेळणे
४)एका पायावर तोलणे
५)शांत संगीतावर हलचाल
६)तीन बोटांचा वापर करून कागद फाडणे
७)सरळ रेषेत कागद फाडणे
८)घडी घालून कागद फाडणे

🄨निर्णयक्षमता विकसनासाठी
९)ठसेकाम
१॰)बाटल्या,बरण्यांची झाकणे काढणे लावणे
११)बाटलीत बरणीत माती भरणे
१२)कडधान्ये निवडायला देणे
(एकाग्रता ,बोटांना वळण लावण्यासाठी)

समजपूर्वक ऐकण्यासाठी
१३)गाणी गोष्टी ऐकवणे
१४)टी व्ही वरील संवाद ऐकवणे
१५)एका वाक्याची सूचना देणे
१६)छोटी शब्दकोडी सोडवायला देणे
१७)मातीकाम
१८)धावदोरा घालणे (स्नायुंची मजबुती )
१९)दोर्‍यांची रंगीत डिझाईन बनवणे
२॰)खडूने चित्र काढुन रांगोळी सोडणे
२१)मुठीने हात न उचलता षटकोन काढणे
२२)वेणी घालणे
२३)आकार काढुन बिया,खडे लावणे
२४)वाचनपूर्व तयारी श्रवण
गोष्टींच्या पुस्तकावर गप्पा मारण
२५)एक काम१५ मिनिटांसाठी  देवून बैठक वाढवण्यास मदत
   वरील सर्व सुरवातीचे उपक्रम पहिलीच्या वर्गात घेवून मुलांची मेंदुला निर्णयक्षमता विकसनास मदत होते .