⧭⧭मराठी कविता वाचा येथे ⧭⧭

⧭⧭मराठी कविता वाचा येथे ⧭⧭


१. आपल्या गुरुजनांवर विनोद पाठविण्यापूर्वी, एकदा खालील कविता वाचून, मग काय ते ठरवा...!*

          ॥ शिक्षक ॥

शाळांना जर का शिक्षक
लाभला नसता...

तर आयुष्याच्या गणिताचा
भूगोल झाला असता.  ॥ १ ॥

फळयावर जर खडूचा
हात फिरला नसता

तर....अ ब क ड ,बाराखडीचा
अर्थ कळला नसता.  ॥ २ ॥

डोळे भरून येतात जेव्हा
हातात पगार येतो.

गुरूजी तुम्हीच आकार दिला,
जेव्हा मातीचा मी गोळा होतो.   ॥ ३ ॥

पायथागोरस, आर्किमिडिज,
 न्यूटनअजूनही तोंडपाठ
आहेत गुरूजी.

तुम्ही शिकवलेल्या पाण्याच्या
  रेणुसूत्रात मला तुम्हीच
दिसता गुरूजी.  ॥ ४ ॥                      

तुमच्या हातून खाल्लेला मार
आजपर्यंत विसरलो नाही मी.

घोड़ी करुन उभे करायचात
तुम्ही आता तीच पद्धत
व्यायामाला वापरतो मी.  ॥ ५ ॥      

शाळा चुकवायचो कित्तेकदा
उनाडक्या करतांना.

पण भीती वाटायची तुमची
गृहपाठ तपासतांना.  ॥ ६ ॥                  

आज मात्र तुम्ही सोशल साईटवर
चेष्टेचा विषय झालात

मास्तर कोमात;  गुरूजी जोमात.
मास्तर पळाला;  यात्रेला गेला.    ॥ ७ ॥

असल्या कमेंट्स,
जेव्हा लोक करतात.

काळीज फाटतंय हो गुरूजी
आमचे आदर्श रोज मरतात.  ॥ ८ ॥                                

तुमची प्रतिमा मात्र माझ्या
हृदयात आदरणीयच राहील.
मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो.
ही जाणीव माझ्या मृत्यूपर्यंत राहील. ॥ ९ ॥

सर्व गुरुजींना समर्पित....

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

२.व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५ वाक्ये 

१. गगनभरारीचं वेड

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

२. झुंज

वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

३. कॅलेंडर

भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.

४. संघर्ष कुठपर्यंत?

आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

५. पडावं तर असं!

आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.

६. परिपूर्णता?

जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..

७. नको असलेला भाग

दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.

८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ

पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?

९. समस्या

अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.

१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?

प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.

११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान

समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.

१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.

१३. पळू नका

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.

१४. पाठीची खाज

पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..

१५. माफी

माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.

१५. खर्च-हिशोब

खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.

१६. गैरसमज

गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकार करतो.

१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

१८. अपेक्षा-ऐपत

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.

१९. अपयशाची भीती

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.

२०. खरी शोकांकिका:

बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.

२१. कौतुकाची खुमारी

कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.

२२. झरा आणि डबकं

वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

२२. कागद-सर्टिफिकेट

सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं.

२३. रातकिड्याचा आवाज

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.

२४.फुगा किती फुगवायचा?

एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता.

२५ हरवण्यासारखं घडवा

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!

---------
अशा प्रकारचे किती तरी messages आपण रोज वाचतो. पण त्यातील 10/20 टक्के तरी आत्मसात करावयाचा प्रयत्न केला तर किती तरी चांगला परिणाम आपल्याच आयुष्यात दिसतील. प्रत्येकाने प्रयत्न करावा ही विनंती.

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%
३.भयानक दरोडा

हॉंगकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.

‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा.

लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव तुमचा आहे.’

दरोडेखारांनी ओरडून सांगताच
सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.

याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’
( Mind Changing Concept ) म्हणजेच माणसांच्या
सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची
किमया.

त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवी
पडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडून
म्हणाला,

‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा
दरोडा आहे, बलात्कार नाही.’

याला म्हणतात व्यावसायिक रहाणे
( Being professional ). आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.

दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी आले.
त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, जो एम.बी.ए. होता
 तो 6 वी पर्यंत शिकलेल्या
सिनियर दरोडेखोराला म्हणाला., ‘चला
आता आपण पैसे मोजायला लागूया!’ त्यावर
सिनिअर दरोडेखोर म्हणाला, ‘वेडा आहेस की
काय? हे पैसे मोजायला कित्येक तास लागतील.
जरा धीर धर. रात्री टी. व्ही.
वरच्या बातम्या बघ. तुला आपोआपच कळेल की
आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.’

याला अनुभव म्हणजेच
‘एक्सपिरिअन्स’
   ( Experience ) असे म्हणतात.

हल्ली कागदी पदव्यांपेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.

दरोडेखोर बँकेतून निघून गेल्यावर बँक मॅनेजर
सुपरवायझरला म्हणाला, ‘ताबडतोब
पोलिसांना फोन कर!’

सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! आपण आधीच बँकेच्या 70 लाख डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना बोलवूया!’

याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’
( Swim with the tide ). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून
स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.

सुपरवायझर म्हणाला, ‘जर दर महिन्यात असा
दरोडा पडला तर काय मजा येईल!’

याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी बदलणे’
( Changing priority).

कारण ‘पर्सनल
हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त महत्वाचा असतो.

दुस-या दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली
की बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला.

पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले.

कारण त्यांनी आणलेली कॅश परत परत मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच निघाली.
मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?

खरी मेख काय आहे ते सिनियर दरोडेखोराच्या बरोबर लक्षात आहे.

 तो वैतागून म्हणाला, ‘आपण
जीवावर उदार होऊन दरोडा टाकला पण.
आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले.

पण
त्या बँक मॅनेजरने मात्र काहीही न करता 80
लाख डॉलर्स लाटले.

खरे आहे माणसाने शिकले पाहिजे.नुसतेच दरोडेखोर न होता ‘सुशिक्षित दरोडेखोर’ व्हायला पाहिजे,’

याला म्हणतात ‘ज्ञान’ म्हणजेच ‘नॉलेज’
( Knowledge) ज्याची किंमत
सोन्यापेक्षाही जास्त असते.

तुमचे सोने नाणे
लोक पळवून नेऊ श.कतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच
पळवून नेऊ शकत नाही.  
🔴 Point to be Note

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

४.    नदीचा उगम पर्वत/ डोंगरातून होतो त्यामुळेच नदीला गिरीजा, शैलजा अशी नावे आहेत. समुद्र हा तिचा प्रियकर..सखा.. एकदा समुद्राला मिळाल्यावर नदी परत पर्वताकडे जात नाही म्हणून नदीला माहेर नाही असे म्हणतात. गदिमांनी जो देखे कवी... वो न देखे रवी...या न्यायाने या  कवितेत हा समज खोडून काढत जलचक्र किती सुंदर शब्दात सांगितलं आहे..

माहेर

नदी सागरा मिळता
पुन्हा येईना बाहेर,🌊
अशी शहाण्यांची म्हण
नाही नदीला माहेर

काय सांगू रे बाप्पानो
तुम्ही आंधळ्याचे चेले,
नदी माहेराला जाते
म्हणूनीच जग चाले

सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर,
तरी तिला आठवतो
जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन,
नदी तरंगत जाते
पंख वाऱ्याचे लावून

पुन्हा होऊन लेकरू
नदी वाजविते वाळा,
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाला

-  ग दि माडगुळकर                      
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

५.॥ व्यवहार आणि अध्यात्म॥
जीवन शतगुणांनी समृद्ध करा
गबाळेपणा टाका
आळस सोडा
दैवाला दोष देत रडत बसू नका
प्रयत्न हाच ईश्वर समजा
जो जसा भेटेल तसेंच त्याच्याशी वागा
दुष्टांशी बेधडक दुष्टपणाने वागा
चातुर्याने वागा
हिशोबी वागणूक ठेवा
आपआपली कर्तव्ये चोख बजावा
जनी निंद्य तें सर्व सोडा
जे जें वंद्य ते मनापासून करा
धीर कधीही सोडूं नका
संकटांनी गडबडून जाऊ नका
जें जें उत्कट अन भव्य असेल तेंच घ्या
जें जें मिळमिळीत असेल तें टाकून द्या
ऐक्याने वागा
बहुतांची मनें सांभाळा,भाग्योदय त्यातूनच होईल
विवेक जागृत ठेवा
अभ्यास सोडूं नका
फुका वाद घालीत बसूं नका
शरीर स्वच्छ ठेवा
झोपा काढण्यात वय घालवू नका
रोज थोडे तरी लेखन-वाचन करीत जा
चांगली संगत धरा
सभेंत चांगल्या प्रकारे वागा
कोणावर विसंबून राहू नका,स्वत:च श्रम करीत जा
आपसांत भांडत बसू नका
संयमाने वागा
शत्रू कोण तें ओळखून त्याच्यावर एकवटून घसरा.
         ॥रामदास स्वामी॥
#################################################################################################################################################################
६.
🎙 शुभेच्छा संदेश🎙
             भाग-1

वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम प्रसंगी..उपयोगात येतील अशा चारोळ्या , सुविचार, शेर इत्यादी....
➖➖➖➖➖➖➖
💐 जीवेत् शरद्: शतम् ....

💐निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।।

💐 तुम जिओ हजारों साल,
साल के दिन हो पचास हजार !!

💐उत्तुंग यशाचा मानकरी तु ,
घे नव्या दिशेने नवी भरारी ।
स्वप्नांचे नव पंख पसरण्या ,
आकांक्षांना देई उभारी ।।
लोकहिताचे भाव निरंतर,
माणुसकीला नको विसरणे ।
आशिर्वच हे , याच शुभेच्छा ,
वाटेवरती हीच शिदोरी ।।

💐 कष्टाचे व्हावे चांदणे ,
यशाचा चंद्र दिसावा ।
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण,
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा ।।

💐सुंदरशा तुमच्या जीवनात,
प्रत्येक क्षण सुख म्हणून यावा ,
नसेल सुख तर आमच्या जीवनातील सुखद क्षण काढून देवाने तुम्हाला द्यावा ।
उदंड आयुष्य तुम्हा लाभो ,
हीच ईश्वर चरणी करतो ईच्छा ।
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ,
देतो लक्ष लक्ष शुभेच्छा !

💐 लिहावं त्यांच्या विषयी ,
शब्दही आनंदी होतील बापुडे ।
बोलावं त्यांच्या विषयी ,
निसर्गही झुकेल ज्यांच्यापुढे ।।

💐 झेप अशी घ्या, की पाहणाऱ्यांची मान दुःखावी ।
गवसणी आकाशाला अशी घाला , की पक्षांनाही प्रश्न पडावा ।
ज्ञान इतके मिळवा, की सागरही अचंबित व्हावा ।
------प्रगती इतकी करा, की काळही पाहातच राहावा ।

💐 मुक्त आता तु ऐक विहंगा रे,
दार पिंजर्‍याचे उघडले पाहा रे ।
पंख फुलवूनी तु उंच झेप घेई,
डोही गगनाच्या हवे तिथे जाई ।
नाही आता तुज पकडणार,
नाही पिंजर्यात पुन्हा जखडणार ।
दिले स्वातंत्र्य तुला पक्षीराया,
मुक्त आकाश तुला हुंदडावया ।।

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

७.
"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या ज्याच्या हाती फक्त  शुन्य होते..."

🌸डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम🌸
 वडील नावाडी होते .विद्यार्थीदशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते ते शास्त्रज्ञ झाले राष्ट्रपती झाले.

🌸 शेक्सपिअर 🌸
  रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला..

🌸 लता मंगेशकर 🌸
वडिल वारल्यावर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी केली.कष्टात दिवस काढले .घर सांभाळले .विविध भाषेत पन्नास हजार गाणि म्हंटली .भारतरत्न हा त्यांना सर्वोच्च किताब मिळाला ...

🌸 ग.दि.माडगूळकर 🌸
मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या .अनवाणी आयुष्य जगले.त्यांनी गीतरामायण लिहले..

🌸 गुलजार 🌸
फाळणी नंतर दिल्लीला आले.मोटार गँरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल राँय भेटले .मोटार गँरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रित आले...

🌸 सुधिर फडके 🌸
चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली .भटकंतीतून त्यांना सुर शोधला .ते गायक झाले, संगीतकार झाले ....

🌸 नीळू फुले 🌸
पुण्याला काँलेमध्ये अकरा वर्षे माळी होते.झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले .नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले...

🌸 विष्णूपंत छञे 🌸
घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वताःच स्वताःचा मार्ग शोधला.भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली ...

🌸 दारासिंह 🌸
पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते .रानात गुरं चरायला जात होते .गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली.जगभर कुस्त्या जिंकल्या .चित्रपटात कामे केली .राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात एकच भावना असते एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला...

🌸एम. एफ. हुसेन 🌸
मुंबईच्या फुटपाथवर सीनेमाची पोस्टर्स रंगवली .पुढच्या आयुष्यात त्यांची चित्रे शंभर कोटींना विकली गेली .भारतात चिञकलेच्या इतीहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला....

🌸 कर्मवीर भाऊराव पाटिल 🌸
कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते.कंदिल नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली ....

🌸 ग्रेटा गार्बो 🌸
गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला.तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी लागली .दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हाँलीवुडचे दरवाजे उघडले ....

🌸 चार्ली चँपलिन 🌸
प्रचंड गरिबी अनुभवली विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली .आपल्या विनोदाने जगभरच्या लोंकाना हसवले...

🌸 सुशीलकुमार शिंदे 🌸
सोलापूरला कोर्टात शिपाई होते.कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले....

🌸 गोपिनाथराव मुंडे🌸
एक गरीब शेतकरी कुटुंबातिल व्यक्तीमत्व, भारताचे ग्रामविकास मंत्री झाले व जनसामान्याच्या ओठावर लोकनेता अशी ओळख निर्माण केली.....

🌸 लक्ष्मणनराव किर्लोस्कर 🌸
दहा वर्षे ड्राईंग टिचर होते.त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला ..

🌸 यशवंतराव गडाख 🌸
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते .मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले वयाच्या पंचविशीत सोनाईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली ....

🌸 धिरुभाई अंबानी 🌸
वडिल प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते.भाऊ रेशनिंग आँफिसात नोकरीला होता .स्वताः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते .अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले ....

🌸 स्टीव्ह जाँब्स 🌸
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले .जगातल्या मोठ्या काँम्प्युटर कंपन्यापैकी एक 'अँपल'
ची स्थापना केली....

🌸 सुनील दत्त 🌸
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला.अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले....

🌸 जाँनी वाँकर 🌸
बस कंडक्टर होता.प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे लोंकानी घ्यायला सुरुवात केली .एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थीरावला....

🌸 महेमूद 🌸
ड्रायव्हर होता.चलती नाम गाडी ,सबसे बडा रुपया त्याने म्हणायला सुरुवात केली .आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वताःलाही समजले नाही.....

"या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शुन्य होते .त्यांनी अथक परिश्रमाने शुन्यातून विश्व निर्माण केले .अनवाणी आयुष्याला आकार दिला परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसापुढे आदर्श ठेवला ..तुम्हीसुध्दा शुन्य असताना स्वताःचे स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण करु शकता....."


!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
८.


















No comments:

Post a Comment