योगासने

योगासने  येथे क्लिक करा

@ योगासने @


      शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन.
   
      स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे 'योगासन' अशी व्याख्या आहे. आपल्याला माहीत असणारी अनेक योगासने 'अवघड' वाटतात. सुरुवातीस योगासने करणे जड जाते. हळूहळू सरावाने आणि शरीर लवचीक झाल्याने ही अवघड दिसणारी आसने 'स्थिर' व 'तणावमुक्त' (सुखाची) होऊ लागतात. असे आदर्श आसन करणे एकदम साधत नाही. काही जणांना काही आसने साधतात, तर इतरांना इतर आसने साधतात. वय व शरीरबांधणीनुसार यात फरक पडतो. लहानपणी शिकल्यास योगासने लवकर येतात. म्हणूनच शाळेपासून योगविद्या शिकवणे आवश्यक आहे. योगासनांचे 6 गट पाडता येतील अ) उभी आसने ब) बैठी आसने क) पाठीवर झोपून करायची आसने ड) पोटावर झोपून करायची आसने इ) खाली डोके वर पाय अशी अवस्था फ) पोटाची आसने/क्रिया या 5 गटांत मिळून शेकडो आसने येतात. मात्र त्यातली निवडक आसने प्रचलित आहेत. सर्व आसने करणे एखाद्यालाच शक्य होते. ही सर्व आसने शरीर सर्वांगाने लवचीक व सुदृढ व्हावे म्हणून उपयोगी आहेत. प्राचीन काळात अनेक योगी (हठयोगी) पुरुषांनी अनेकविध आसने शोधली. नाशिकच्या कुंभमेळयातले फोटो किंवा टी.व्ही दृश्ये आपण पाहिली असतील. देशातले शेकडो-हजारो साधू-बैरागी कुंभमेळयास जमतात. तासन् तास योगासने करण्याची त्यांची शक्ती व साधना अचंबित करते. एका पायावर उभे राहणे (एकपादासन), शीर्षासन (खाली डोके वर पाय), पद्मासन (बैठक) आदि आसने लीलया ते तासन् तास ठेवू शकतात. असा हठयोग सामान्य माणसाला साधणे अवघड आहे. सामान्य व्यक्तीकडून तशी अपेक्षाही नसते. आरोग्यासाठी योग एवढेच आपले इथे उद्दिष्ट आहे. वरील पाच गटांतील विविध आसने आपल्याला योगशिक्षकाकडूनच शिकावी लागतील. आपल्या कुवतीनुसार योग्य ती आसने आणि क्रम शिकायचे असतात. तक्त्यात योगासनांची गटवारी दिली आहे. ही वर्गवारी केवळ माहीतीसाठी आहे.

 @ योगासनांचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

@ योगासनाचे प्रकार व त्यांचे फायदे / लाभ ....


  1. सिद्धासन
  2. मकरासन
  3. शीर्षासन
  4. कर्ण पिडासन
  5. योग मुद्रासन
  6. शशकासन
  7. पवन मुक्तासन
  8. मत्स्यासन
  9. मण्डुकासन
  10. धनुरासन
  11. दीर्घ नौकासन
  12. उत्तान पादासन
  13. कन्धारासन
  14. बद्ध पद्मासन
  15. गो रक्षासन
  16. सर्वांगासन
  17. त्रिकोणासन
  18. सुप्त वज्रासन
 @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@2
 [05:06, 3/9/2017] +91 94206 38951: मकरासन,

क्रिया :



१. जमिनीवर पालथे झोपा. हात दुमडून तळवे एकमेकांवर ठेवा.

२. माथा दोन्ही हातावर टेकवून ठेवा. पायात एक फूटाचे अंतर असावे.

३. शरीराला प्रेतासारखे शिथिल सोडा. या आसनात झोपून तुम्ही प्रेताचे ध्यान करा आणि विवेकपूर्वक चिंतन, मनन करत स्वत:ला आत्मकेंद्रित करा. मी या शरीरापासून पृथक, शुद्ध-बुद्ध, आनंदमय व अविकारी चैतन्य आत्मा आहे. हे शरीर तर नश्‍वर आहे. हे शरीर केवळ पंचतत्वांचा समूह आहे.

जेव्हा वेळ येईल तेव्हा हे शरीर पंचतत्वात विलीन होऊन जाईल. हे शरीर व इतर संपत्ती इथेच राहून जाईल. ना तर बरोबर काही आणले होते ना काही घेऊन जाणार. अशा प्रकारे या नश्‍वर जगातून आपले चित्त हटवून अनंत ब्रह्मांडात बसलेल्या अनंत ब्रह्मात स्वत:ला समाहित समर्पित करत आनंदाची अनुभूती करा.

लाभ :

१. हे विश्रामासाठी आसन आहे. विश्रामात केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक रूपानेसुद्धा व्यक्ती स्वत:ला हलके अनुभव करते. उच्च रक्तदाब, मानसिक तणाव व अनिद्रेपासून मुक्ती मिळते. आसन करताना मधून मधून विश्रामासाठी हे आसन करावे. पोटाचुआ आतड्यांना आपोआपच मालीश होते ज्यामुळे सक्रिय होऊन मंदाग्नी इत्यादी विकार दूर होतात.

२. हातांच्या स्थितीत पॅसिव्ह स्ट्रेचिंग कंडिशन होण्याने पॅरा सँपेथेटिक नर्व्हज प्रभावित करून शरीराला शिथिल सोडण्यात मदत मिळते.

३. ह्रदयाला गुरूत्वाकर्षाच्या विरूद्ध कार्य न केल्याने ह्रदयाला विश्राम मिळतो.

४. अंत: स्त्रावे ग्रंथी लाभान्वित होतात.                        Makarasana - मकरासन (Crocodile Pose)Makarasana or the Crocodile pose is a yoga asana used for relaxation. In sanskrit, ‘Makar’ means crocodile and ‘Asana’ means a pose. Makarasana is a yogic po...www.youtube.com
[05:06, 3/9/2017] +91 94206 38951: https://youtu.be/x0zECCZHe7c













No comments:

Post a Comment