बोधकथा

    बोधकथा         ✳ संस्कारमाला ✳

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
          🎀 म्हातारा सिंह🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
          एक सिंह फार म्हातारा झाला होता. तो अगदी मरावयास टेकला आहे असे कळताच ज्या प्राण्यांना त्याने त्रास दिला होता ते सगळे सूड घेण्यासाठी तो पडला होता तेथे आले.
          बैलाने आणि रेड्याने आपली शिंगे रोवून त्याला जखमी केले. कुत्र्याने त्याच्या अंगावर भुंकून त्याला चावे घेतले. रानडुकराने आपले सुळे त्याच्या पोटात खुपसले व शेवटी गाढव पुढे होऊन त्याने त्याच्या तोंडावर लाथा झाडल्या.
           त्या वेळी मरावयास टेकलेला तो सिंह म्हणाला, 'देवा रे देवा, माझी ही काय स्थिती केली आहेस ?' शूर व पराक्रमी अशा प्राण्यांनाही थरथर कापविणारा जो मी, त्याला आज नीच गाढवाच्या लाथा निमूटपणे सहन कराव्या लागत आहेत. यापेक्षा हजार मृत्यूंचे दुःख मी मोठ्या सुखाने पत्करले असते.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 तात्पर्य : - आपल्या चांगल्या अवस्थेत आपण इतरांना छळतो, पण जेव्हा आपल्यावर वाईट अवस्था येते तेव्हा अत्यंत क्षुद्रही त्याचा सूड घेतल्याशिवाय राहात नाहीत

        बोधकथा
👇🚩🚩🚩🚩🚩📲📲📲📲👇
     " एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.
एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .
सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.
थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते. गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.
तात्पर्य -आति शहाणा त्याचा बैल रिकामा "
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

   🗯 आजची बोधकथा🗯
" एक उंट जंगलात चरण्‍यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्‍ट कोल्‍हा त्‍याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्‍याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्‍हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्‍हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्‍हा कोल्‍हा म्‍हणाला,'' मी तर रोज जवळच्‍याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्‍या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्‍ह्याला त्‍याने तेथे नेण्‍यासाठी विनंती केली.
उंट कोल्‍ह्यासोबत शेतात गेला. कोल्‍ह्याने आधी जाऊन स्‍वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्‍ह्याने मग जोराने कोल्‍हेकुई सुरु केली. कोल्‍ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्‍याचे चार गडी शेतात घुसले. त्‍यांना पाहताच कोल्‍ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्‍यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.
त्‍याला मार खाताना पाहून कोल्‍ह्याला खूप आनंद झाला. या गोष्‍टीला काही दिवस गेले. कोल्‍ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्‍हा शेतात नेले व पुन्‍हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्‍यालाच मार पडतो ही गोष्‍ट आता उंटाच्‍या लक्षात आली व त्‍याने कोल्‍ह्याची खोड मोडण्‍याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्‍ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्‍यांना बाहेर काढण्‍याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्‍हा कोल्‍ह्याची वेळ आली तेव्‍हा उंटाने मुद्दामच जास्‍त खोल पाण्‍यात नेऊन डुबकी मारली. कोल्‍हा पाण्‍यात पाण्‍यात बुडून मरण पावला.
तात्‍पर्य :करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्‍याला मिळते
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



   🎀 लहान झाड व मोठे झाड🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
नदीच्या काठी मोठे झाड होतेते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले. वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान झाडाला विचारले, 'अरे, या वार्‍याने माझ्यासारखं मोठं झाड पाडलं, त्या वार्‍याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास ?' त्यावर लहान झाडाने उत्तर दिलं, 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय. बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात घेऊन मी वार्‍यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎀 तात्पर्य : - समर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे, तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते बर्‍याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@



👉👉 आजची बोधकथा
" एका गावाच्या जवळ एक तळे होते. त्या तळ्यामध्ये एक हंसीण रहात होती. त्या तळ्याजवळच एक गरीब बाई आपल्या दोन मुलीं सोबत राहत होती. त्या हंसीणला सोन्याची पिसे होती. एके दिवशी हंसीणला वाटते की, आपण या गरीब बाईला सोन्याची पिसे देऊन मदत करूयात. आपण जर या बाईला मदत केली तर ती आणि तिच्या मुली आनंदाने राहतील.
दुसऱ्या दिवशी हंसीण त्या गरीब बाईला भेटायला गेली आणि म्हणाली, माझे एक सोन्याचे पीस मी तुम्हाला रोज देत जाईन. त्यानंतर हंसीण रोज त्यांना एक सोन्याचे पीस देऊ लागली. त्यामुळे ते कुटुंब सुखी झाले. कुटुंबाची परिस्थिती बदलली. आता ते आनंदाने राहू लागतात.
पुढे ती बाई लोभी बनली. ती ठरवते की एकदाची हंसीणची सर्व पिसे काढून घेऊयात. दुसऱ्या दिवशी ती बाई हंसीणला पकडते आणि पिसे ओढू लागते. पण अचानक त्या हंसीणच्या पिसांचे रंगरूप पालटते. पिसे सामान्य होऊन जातात. ते पाहून बाईला आश्चर्य वाटते.
हंसीण तिला म्हणते ' मी तुला मदत करण्याचे ठरवले होते पण तू हावरट झालीस. आता मी कधीही पुन्हा परत येणार नाही.' या बाईला आपली चूक उमगते आणि ती त्या हंसीणची माफी मागते. हंसीण तिला म्हणते 'पुन्हा कधी असा हावरटपणा करू नकोस' असे म्हणून ती उडून जाते.
तात्पर्य -माणसाने जास्त लोभी नसावे जे मिळते ते ही गमवून बसतो."
 @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

👉👉 आजची बोधकथा
🗯🗯 खरा न्याय 🗯🗯
  " एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो. शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.
तात्पर्य -खरा न्याय करावा."@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
 आजची बोधकथा
         " एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार🏇🏇🏇 करण्यासाठी जात असतो जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे🚱🚱 नोकर कासावीस होऊ लागतात . 🏖🏖
त्यांची अवस्था पाहून व्यापारी मनात विचार करतो जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही.मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. ☘☘☘
व्यापारी विचार करतो 🤔🤔कि जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी असावे . व्यापाऱ्याला हायसे वाटते. 🙂🙂

व्यापार्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले त्याचे नोकर खोदतात पण खाली दगडच दिसतात. पाणी लागताच नाही व्यापारी म्हणतो आणखी थोल खोद व्यापारी दगडांना आपले कान लावतो त्याला जमिनी खालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो. आणि काय आश्चर्य जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिउन सर्वाना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते. 👏💪🙋‍♂
तात्पर्य – प्रयत्न केला तर यश मिळते. "
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

स्‍वावलंबनातून बंधा-याचे काम

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.255

उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात एका संन्‍याशाने मुक्काम केला होता. ज्‍या गावात संन्‍याशीबुवा राहत होते तेथे पावसाळ्यात गंगानदीला प्रचंड पूर येत असे. त्‍यामुळे गाव पाण्‍यात बुडून जात असे. संन्‍याशीबाबांना हे गावाचे दु:ख बघवले नाही. त्‍यांनी गावक-यांना याबाबत विचारले असता सगळे गावकरी म्‍हणाले महाराज पाऊसकाळ सुरु झाला की आम्‍ही आमची घरेदारे इथेच सोडून दुस-याठिकाणी स्‍थलांतर करतो. पाऊस येतो, गंगामाई रौद्रावतार धारण करते आणि आमचे सर्वस्‍व लुटून परत जाते. मग पूर ओसरला की आम्‍ही येथे येतो आणि पुन्‍हा सगळी जमवाजमव चालू होते. संन्‍याशीबुवांना वाईट वाटले, त्‍यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली आणि त्‍यांच्‍या असे लक्षात आले की एकाच ठिकाणाहून गावात नदी प्रवेश करते आणि त्‍या जागेवर जर बंधारा बांधला तर नदीचा गावातील प्रवेशाचा मार्ग बदलता येऊ शकतो. यासाठी त्‍यांनी गावातील लोकांना बंधारा बांधण्‍याविषयी सुचविले. गावकरी म्‍हणाले, महाराज, आम्‍ही प्रशासनास नदीवर बंधारा बांधण्‍याविषयी अनेकदा सांगून पाहिले पण त्‍याची दखल कोणीही घेतली नाही. संन्‍याशीबुवा म्‍हणाले, मग आपण बंधारा बांधूया. श्रमदानाने काही वाटेल ते शक्य आहे. पण कोणीही तयार झाले नाही. मग दुसरे दिवशी संन्‍याशीबुवाने स्‍वत:च कुदळ, फावडे, पाटी घेऊन बंधा-याचे काम सुरु केले. काही लोकांनी ते पाहिले. रोजच संन्‍याशी दिवसभर एकटाच काम करत असे. पण इतका मोठा बंधारा बांधणे हे काही त्‍यांच्‍या एकट्याच्‍या आवाक्याबाहेरचे होते. लोकांनी हे संन्‍याशीबुवाचे काम पाहिले व त्‍यांना वाटू लागले की हे महाराज त्‍यांचा कोणताही स्‍वार्थ नसताना किंवा त्‍यांचे कोणतेच नुकसान होत नसताना केवळ आपल्‍यासाठी इतके कष्‍ट घेत आहेत मग आपणही त्‍यांची मदत केली पाहिजे. हळूहळू लोकांनी महाराजांना मदत करायला सुरुवात केली आणि मग सगळ्या गावक-यांनी मिळून मोठा बंधारा त्‍या नदीवर बांधून काढला व पूर येण्‍यापासून गावाचे संरक्षण केले.

तात्‍पर्य :- अशक्‍य वाटणा-या गोष्‍टीसुद्धा एकमेकांच्‍या सहकार्याने सहजगत्‍या साध्‍य होऊ शकतात. गरज आहे ती फक्त संघटीत होऊन काम
********************************************************************************
फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.255

उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात एका संन्‍याशाने मुक्काम केला होता. ज्‍या गावात संन्‍याशीबुवा राहत होते तेथे पावसाळ्यात गंगानदीला प्रचंड पूर येत असे. त्‍यामुळे गाव पाण्‍यात बुडून जात असे. संन्‍याशीबाबांना हे गावाचे दु:ख बघवले नाही. त्‍यांनी गावक-यांना याबाबत विचारले असता सगळे गावकरी म्‍हणाले महाराज पाऊसकाळ सुरु झाला की आम्‍ही आमची घरेदारे इथेच सोडून दुस-याठिकाणी स्‍थलांतर करतो. पाऊस येतो, गंगामाई रौद्रावतार धारण करते आणि आमचे सर्वस्‍व लुटून परत जाते. मग पूर ओसरला की आम्‍ही येथे येतो आणि पुन्‍हा सगळी जमवाजमव चालू होते. संन्‍याशीबुवांना वाईट वाटले, त्‍यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली आणि त्‍यांच्‍या असे लक्षात आले की एकाच ठिकाणाहून गावात नदी प्रवेश करते आणि त्‍या जागेवर जर बंधारा बांधला तर नदीचा गावातील प्रवेशाचा मार्ग बदलता येऊ शकतो. यासाठी त्‍यांनी गावातील लोकांना बंधारा बांधण्‍याविषयी सुचविले. गावकरी म्‍हणाले, महाराज, आम्‍ही प्रशासनास नदीवर बंधारा बांधण्‍याविषयी अनेकदा सांगून पाहिले पण त्‍याची दखल कोणीही घेतली नाही. संन्‍याशीबुवा म्‍हणाले, मग आपण बंधारा बांधूया. श्रमदानाने काही वाटेल ते शक्य आहे. पण कोणीही तयार झाले नाही. मग दुसरे दिवशी संन्‍याशीबुवाने स्‍वत:च कुदळ, फावडे, पाटी घेऊन बंधा-याचे काम सुरु केले. काही लोकांनी ते पाहिले. रोजच संन्‍याशी दिवसभर एकटाच काम करत असे. पण इतका मोठा बंधारा बांधणे हे काही त्‍यांच्‍या एकट्याच्‍या आवाक्याबाहेरचे होते. लोकांनी हे संन्‍याशीबुवाचे काम पाहिले व त्‍यांना वाटू लागले की हे महाराज त्‍यांचा कोणताही स्‍वार्थ नसताना किंवा त्‍यांचे कोणतेच नुकसान होत नसताना केवळ आपल्‍यासाठी इतके कष्‍ट घेत आहेत मग आपणही त्‍यांची मदत केली पाहिजे. हळूहळू लोकांनी महाराजांना मदत करायला सुरुवात केली आणि मग सगळ्या गावक-यांनी मिळून मोठा बंधारा त्‍या नदीवर बांधून काढला व पूर येण्‍यापासून गावाचे संरक्षण केले.

तात्‍पर्य :- अशक्‍य वाटणा-या गोष्‍टीसुद्धा एकमेकांच्‍या सहकार्याने सहजगत्‍या साध्‍य होऊ शकतात. गरज आहे ती फक्त संघटीत होऊन काम करण्‍याची.

***********************************************************************************

अहंकारी राजाला धडा

फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा

कथा क्र.254

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,

तात्‍पर्यः- जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे.



विश्‍वासाला तडा

राजा आणि संत



कथा क्र.252

एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले.

तात्‍पर्य : चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी चुकीच्‍या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.

वर्तमानपत्रातून संग्रहित







































































































































































































































































No comments:

Post a Comment