* रजा नियम *

* रजा नियम *


==========================
▶महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१◀
==========================
     महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदी सर्व शिक्षक व सरकारी नोकरांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.नोकरी लागल्यापासून ते नोकरी असेपर्यंत व निवृत्ती झाल्यानंतरही नियमांची आवश्यकता असते तेव्हा या नियमांचा अभ्यास क्रमप्राप्त आहे हे नियम १५ ऑगस्ट १९८१ पासून अंमलात आले आहेत.
    महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१ >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
-------------------------------------------------
      शासकीय कर्मचाऱ्याला त्याच्या सेवाकाळात विविध प्रकारच्या रजा मिळत असतात. त्या उपभोगत असतांना सेवेत त्याचे महत्व व परिणाम आपणांस माहिती असावी तर जाणून घेऊ-
▶महाराष्ट्र नागरी सेवा(रजा)नियम-१९८१◀
                  महाराष्ट्र नागरी सेवा(रजा) नियम-१९८१ या अधिनियमात साधारणतः नियम-१ ते ९७ असून विविध रजांची सविस्तर माहिती आहे.
⏺रजाविषयक सर्वसामान्य अटी:-नियम-१० :-
------------------------------
       रजा म्हणजे सक्षम अधिकाऱ्याचा कामावर गैरहजर असल्याचा परवाना. रजेचा अर्ज केल्यावर  रजा मिळेलच असे नाही. सर्वस्वी हा शासनाचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.सार्वजनिक हितार्थ रजा मंजूर, नामंजूर करणे हे अधिकार शासनाचे आहेत.
⏺रजेची मंजूरी नियम-११ ते २२:-
-----------------------------------------
१)रजा मंजूर करतांना शिल्लक रजा,पूर्वी घेतलेली रजा,रजा मुदतीत व्यवस्था, प्रकार, कारण व अपेक्षिलेली रजा यांचा विचार केला जातो.
२)अनेक प्रकारच्या रजा संयुक्तपणे घेता येतील.
३)अपवादात्मक परिस्थितीत खास प्रकरणांसह पाच वर्षांपेक्षा जास्त रजा सलगपणे घेता येत नाही.
४)रजा मुदतीत अन्य नोकरी स्वीकारता येणार नाही.
⏺किरकोळ रजा:-
-------------------------
निश्चित नियमांनी उपबंधित करता येणार नाही अशा विशेष परिस्थितीत देण्यात येते.
शासकीय कर्मचारी (शिक्षकेत्तर)यांना ८ दिवस .
मुख्याध्यापक व शिक्षक यांना १२ दिवस किरकोळ रजा मिळते.
   एकावेळी सुट्टी कालावधी धरून ७ दिवसांपेक्षा जास्त घेता येणार नाही.तसेच या रजेस जोडून दीर्घ रजा घेता येणार नाही.
देय व अनुज्ञेय रजेचे प्रकार
▶अ) सामान्य प्रकार:-
~~~~~~~~~~~~~~
१)अर्जित रजा (नि.५० ते५४)-
~~~~~~~~~~~~~~~~
-  सुट्टया मिळणाऱ्या खात्याव्यतिरिक्तच्या सेवकास प्रत्येक सहामाहीस १५ दिवस याप्रमाणे मिळते.
-  मुख्या. व शिक्षक यांना प्रत्येक सहामाहीस ०५ दिवस मिळतात.
-  एका वेळेस १८० दिवसांपेक्षा जास्त घेता येत नाहीत.
-  जास्तीत जास्त ३०० दिवस साठवता येते.
-  रजा पुर्ण दिवसात मंजूर करावी.
-  निलंबन काळ सहामाहीत समाविष्ट नसतो.
२)अर्धपगारी रजा(नि.६०):-
~~~~~~~~~~~~~~~
-  शासकीय सेवकास वर्षासाठी २० मिळतात.
-  वैद्यकीय अथवा खाजगी कारणासाठी मिळेल.
-  रजा साठवण्यास किंवा एका वेळी घेण्यास बंधन नाही.
-  यात वेतन ५० टक्के तर महागाई भत्ता,घरभाडे, पूरक भत्ता पूर्ण मिळतो.
३)परावर्तित रजा (नि.६१):-
~~~~~~~~~~~~~~
अर्धपगारी रजेच्या गटात तर वैद्यकीय कारणाशिवाय दिली जात नाही.
४)नादेय रजा किंवा अनार्जित रजा (नि.६२):-
~~~~~~~~~~~~~~
कर्मचारी परत सेवेत हजर होईल अशी खात्री पटल्यानंतर ही रजा देता येते.ही कायम कर्मचारी यांनाच मिळते.
५)असाधारण रजा किंवा अवेतनिक रजा (नि.६३):-
~~~~~~~~~~~~~~~~~
रजा शिल्लक नसतांना विशिष्ट बाब म्हणून दिली जाते.
▶ब) खास प्रकार:-
~~~~~~~~~~~
   याबाबतचा हिशोब स्वतंत्ररित्या ठेवला जात नाही.
१)विशेष विकलांगता रजा-
~~~~~~~~~~~~~~
सेवा बजावतांना शारीरिक अथवा मानसिक विकलांगता झाल्यास-कमाल २४ महिने देय पैकी १२० अर्जित रजेप्रमाणे वेतन नंतर अर्धपगार वेतन.
२)अध्ययन रजा (नि.८० ते ९३):-
~~~~~~~~~~~~~~~
  उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमाल २८ महिने.
३)प्रसुती रजा (नि.७४):-
~~~~~~~~~~~~~
-  फक्त स्त्री कर्मचाऱ्यास देय आहे.
-  ह्यात दोन अपत्य यांना १८० दिवस याप्रमाणे मंजूर होते.
- १ वर्षापर्यंत सेवा वेतन मिळत नाही.
-  २ वर्षापर्यंत सेवा अर्धपगारी रजा मिळते.
-  या रजेला जोडून देय व अनुज्ञेय रजा घेता येते.
-  शिक्षण सेवक कालावधी पुढे वाढविला जाणार नाही. शासन निर्णय-२५/३/३०१३
-  गर्भपात अथवा मिसक्यारेज झाल्यावर ६ आठवडे रजा मिळते.
-  मूल दत्तक घेतलेल्या महिलेस १ वर्ष किंवा मुलाचे वय १ वर्ष होईपर्यंत रजा अनुज्ञेय आहे.
४)रूग्णालयीन रजा -(नि.७७):-
~~~~~~~~~~~~~~~~
वनरक्षक, तुरूंगरक्षक, प्रयोगशाळा कर्मचारी यांना देय
५) खलासी यांना मिळणारी रजा-(नि.७८)
▶क)सेवानिवृत्तीशी निगडीत रजा-(नि.६६):-
▶ड)रोखीत रूपांतर होणाऱ्या रजा-(नि.६८):-
शिक्षकांना लागू नाही.
▶इ) प्रासंगिक रजा

44 comments:

  1. किरकोळ रजा १२ असल्याचा शासन निर्णय आहे का

    ReplyDelete
  2. किरकोळ रजा १२ असल्याचा शासन निर्णय आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकाना १२ व शिक्षकेत्तर कर्मचारी याना ८ किरकोळ रजा म्हणता मग हा नियम खाजगी शाळांच्या बाबतीत आहे की शासकीय जर हो तर तो स्पष्ट उल्लेख असलेल्या शासन निर्णय क्रमांक द्यावे

      Delete
    2. yes ahe 21/7/2005 cha

      Delete
  3. 12 किरकोळ रजेचा GR असेल तर पाठवा.

    ReplyDelete
    Replies
    1. 12 रजेचा जी आर असेल तर पाठवा

      Delete
  4. गर्भपात रजा चा शासन निर्णय पाठवा

    ReplyDelete
  5. किरकोळ रजेला जोडून सुट्टी असल्यावर काय ?याबाबत जी आर असेल तर कळवा

    ReplyDelete
    Replies
    1. रजा लागत नाही

      Delete
    2. वरील प्रश्नाचे उत्तर मिळावे

      Delete
  6. अध्ययन रजा मंजूर करण्याचे नियम

    ReplyDelete
  7. अध्ययन रजा मंजूर करण्याचे कार्यपद्धती काय आहे?

    ReplyDelete
  8. मी माहे-नोव्हेंबर/2019 मध्ये सेवानिवृत्त होणार असुन सन् 2018अखेर 300 दिवस अर्जित रजा शिल्लक आहे.तर चालु वर्षात अर्जित रजा न घेता 15 दिवस रजेचे रोखीकरण करु शकतो काय?

    ReplyDelete
  9. कमीत कमी किती दिवस एका वेळी अर्जित रजा घेता हेते

    ReplyDelete
    Replies
    1. कमीत कमी किती दिवस अर्जित रजा घेता येते.

      Delete
    2. कमीत कमी किती दिवस अर्जित रजा घेता येते

      Delete
  10. पोलीस सलग किती दिवस जोडुन साप्ताहिक सुट्टी घेऊ शकतात

    ReplyDelete
  11. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक अध्ययन रजा संदर्भात शासननिर्णय पाठवा सर

    ReplyDelete
    Replies
    1. शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर असेल तर रजा मांडण्याचा अधिकार कोणाला आहे.

      Delete
    2. लगतचा उपस्थित जेष्ठ शिक्षक

      Delete
  12. सर, शिक्षण सेवक कालावधी दरम्यान अन्य कोणत्याही रजा असतात का..?

    ReplyDelete
  13. २०% वेतन मिळणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रिया साठी व त्यानंतर काळजी व देखभाल करण्यासाठी कोणती व कमाल किती दिवसाची रजा मंजूर होऊ शकते. क्रपया मार्गदर्शन केल्यास उपकार होतील.

    ReplyDelete
  14. खाजगी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडताना संस्थेची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे का? असा नियम अथवा शासन निर्णय असेल तर कृपया सांगा

    ReplyDelete
  15. २४० दिवसापेक्षा कमी दिवस भरले तर रजा किती मिळतात

    ReplyDelete
  16. गणपती सुट्टीला (पाच दिवस) जोडून अर्जित रजा घेतल्यास त्या रजा दिवस गणना सुट्टी सोडून होतील किंवा सुट्टी सह होतील?

    ReplyDelete
    Replies
    1. सुट्टीला जोडुन रजा काढल्यास सुट्टी ची रजा होते काय जिस आर पाठवा

      Delete
    2. 24 मार्च 1982 वित्त विभाग

      Delete
  17. त्यांच्या मुख्याध्यापकांच्या दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत यांबाबत जीआर असेल तर टाका

    ReplyDelete
  18. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी रजा घेता येते का

    ReplyDelete
  19. BEO & BDO किती दिवसापर्यंत आर्जित रजा मंजूर करतात

    ReplyDelete
  20. शिक्षकांना बारा किरकोळ रजा असल्याबाबत चे परिपत्रक,शासन निर्णय असेल तर पाठवा

    ReplyDelete
  21. प्राथमिक शिक्षकांना एकाच महिन्यात जास्तीत जास्त किती दिवस किरकोळ रजा घेता येते?

    ReplyDelete
    Replies
    1. या प्रश्नाचे कृपया उत्तर मिळावे.वारंवार येणारी समस्या आहे

      Delete
  22. शिक्षक उशिरा येण्याबाबत काय नियमावली आहे?

    ReplyDelete
  23. EL घेताना कमीत कमी किती दिवसाची घेता येते
    (म्हणजे 1 दिवसाची EL घेता येते का)

    ReplyDelete
    Replies
    1. होय मात्र पूर्व परवानगी घ्यावी लागेल

      Delete
    2. तसा शासन निर्णय किंवा दिनांक मिळेल का?

      Delete
  24. 12 CL Gr शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 19 मे 2004 चा शासन आदेश

    ReplyDelete
  25. राजेंचे रोखीकरन माध्यमिक शिक्षकांना करता येते का.

    ReplyDelete
  26. मुख्याध्यापक दीर्घ रजेवर गेल्यास सहीचे अधिकाराबाबत नियम सांगा

    ReplyDelete
  27. शिक्षण सेवक कालावधी मधे प्रसूती रजा मिळते का ? शिक्षणसेवक कालावधी वाढतो का ?

    ReplyDelete