यशस्वी होण्याचे नियम

यशस्वी होण्याचे नियम

यशस्वी होणे हे प्रत्येकाचेच ध्येय असते .पण फार थोडेच लोक आत्मचिंतन करून स्व:तच्या यशाचा खडतर मार्ग शोधून काढून त्या मार्गे जाऊनच यशस्वी होतात तेव्हा सर्वसामान्यत: यश हे सहजासहजी कोणालाच मिळत नसते,तसेच यशाची व्याख्या सुद्धा व्यक्तिपरत्वे,स्थाना परत्वे वेगवेगळी असू शकते.एवढे मात्र निश्चित आहे कि यशा साठी लढा प्रत्येकाला द्यावाच लागतो आणि हा लढा नेहमीच स्वकियांशीच म्हणजे स्वतः मधील दुर्गुण, अज्ञान यान्च्या विरोधात असलेला लढा असतो तेव्हा हा मार्ग चालू लागू या . यशस्वी होऊन इतरांना हि यशस्वी करू या .

यशाचा मार्ग मला दिसत नाही ,
कारण यशस्वी होण्याचे ठरत नाही.||
निर्धाराने मी ठाम बसत नाही,
आणि यश मजकडे फिरकत नाही.||
चिंतनाने जागवले महाभारत,
प्रथम भीमच आला बाहु सारत||
तुला जर यशस्वी व्हायचेच आहे ,
तर पुर्णारोग्य हाच पर्याय आहे ||
जर तु पूर्ण आरोग्य राखले,
तरच मिळतील यशाचे दाखले||
पुर्णारोग्याची खूण ती काय ?
समजाऊन मला तु सांगशील काय?
पाय गरम्,पोट नरम्,थंड माथा
हीच आहे पुर्णारोग्याची गाथा ||
मला तर लागले यशाचे पिसे
प्रश्न मला हे साधायचे कसे?
आरोग्य रूपी भीमाचा दावा
दहा टक्के तरी सुविचार हवा ||
त्यावर पंधरा टक्के सुवर्तन
नक्कीच करेल तुझ्यात परिवर्तन ||
सोबत असावे पंचेवीस टक्के विज्ञान ,
विज्ञानयुगात राहू नये अज्ञान||
येथे तुला अर्धे यश मिळेल ,
उर्वरित अध्यात्माने सिद्ध पावेल||
सुविचारी सहदेव सुरवातीला ,
सुवर्तनी नकुल सह सोबतीला ||
अर्जुन तर असे विज्ञान राज ,
आणि अध्यात्म असे धर्मराज ||
एक वासना शंभर विकार ,
आमुच्यापुढे घेती माघार ||
जेथे आम्ही नांदू एकत्र
यशच यश दिसेल सर्वत्र || 

(१०% सुविचार +१५% सुवर्तन +२५% विज्ञान +५०% अध्यात्म, यानेच १००%पूर्ण आरोग्य लाभते पुर्णारोग्य हेच यशस्वी जीवन होय )

 @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@२@@@@@

 
डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.* आवडली पोस्ट तर नक्की शेअर करा --------------------------------------------- 👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या. 
 
👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा. 👍 
 
 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात . 👍 
 
 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय. 👍 
 
 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा. 👍 
 
नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे. 👍 नियम 
 
७ – उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्दत मात्र वेगळीच असते. ख-या जगात हरणार्‍याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो. 👍 
 
 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो. 👍 
 
 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. ख-या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम. 👍 नियम १० – स्वप्न ते नाहीत जे तुम्ही रात्री झोपेत बघतात , स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही । Think Good! Do Good!! Be Good!!!
🔠🔠

1 comment: