Digital Class साठी माहिती

  ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन लेखमाला 16
(1) स्मार्ट बोर्ड (इंटरअॅक्टीव व्हाइट बोर्ड)
    दुसर्‍या लेखात सांगितल्याप्रमाणे शेवटची बारावी लागणारी वस्तु आहे ई-लर्निंग शैक्षणिक सॉफ्टवेअर. याची माहिती आपण या लेखामालेच्या सर्वात शेवटच्या भागात पाहुयात. मागील सर्व लेखामध्ये आपण ज्या वस्तु किंवा हार्डवेअर पहिले आहे त्या एक प्राथमिक ई-लर्निंग क्लासरूम साठी आवश्यक आहेत. आता ज्यांच्याकडे अशी क्लासरूम आहे त्यांनी ती क्लासरूम अजून आधुनिक आणि अद्यावत करण्यासाठी काय लागेल याची माहिती आम्ही तिसर्‍या लेखमाले मध्ये दिली आहे. त्यातील वस्तु आपण विस्ताराने बघूयात.
1) स्मार्ट बोर्ड – स्मार्ट बोर्ड म्हणजे हा एक प्रकारचा टच स्क्रीन बोर्ड असतो. हा बोर्ड दिसायला आपलया व्हाइट बोर्ड सारखा असतो. याला इंटरअॅक्टीव व्हाइट बोर्ड असेही म्हणतात. स्मार्ट बोर्ड हा आपल्या मोबाइल सारखा टच स्क्रीन असतो. ह्या बोर्डला कम्प्युटर किंवा लॅपटॉपला जोडावे लागते व एक पॉवर केबल असते. हा बोर्ड वापरण्यासाठी प्रोजेक्टर लागतो. प्रोजेक्टचा फोकस या बोर्ड वर पडल्यानंतर हा बोर्ड टच स्क्रीन होतो. ह्या बोर्ड च्या मागे बारीक तांब्याच्या तारेची जाळी असते हे टच सेन्सर असतात.  ह्या बोर्ड सोबत एक डिजिटल पेन मिळतो याच्या मदतीने आपल्याला या बोर्ड लिहिता येते. स्मार्ट बोर्ड साठी आदर्श प्रोजेक्टर म्हणून तुम्ही Epson चा shortthrow प्रोजेक्टर Epson PowerLite 525 W वापरू शकता. याचा उपयोग असा होतो की आता पर्यन्त ई-लर्निंग क्लासरूम मध्ये शिक्षक एखादा शैक्षणिक विडियो, गाणे, ऐंनिमेशन किंवा शैक्षणिक सॉफ्टवेअर चालू करून निवांत मागे जाऊन बसत असे. यामध्ये शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग असत नव्हता. त्यामुळे हे एक पिक्चर बघितल्यासारखे होते. हे परिणामकारक शिकवणे होणार नाही. आपण वर्गात कसे मुलांना प्रश्न विचारून, त्यांना फळ्यावर लिहून दाखवायला सांगून त्यांचा सहभाग घेतो तसेच आपल्याला स्मार्ट बोर्ड वापरताना करता येते. स्मार्ट बोर्ड वापरुन आपण एखाद्या आकृतीवर, चित्रावर, विडियोवर लिहू शकतो. इंटरनेट वरुन चित्रे, आकृत्या डाऊनलोड करून ती मुलांना दाखवू शकतो. आकृत्यांची नावे त्यावर लिहू शकतो, मुलांना लिहून दाखवयाला सांगू शकतो. एखादा शैक्षणिक विडियो दाखवताना मधेच थांबवून त्यावर लिहू शकतो. शैक्षणिक सॉफ्टवेअर दाखवत असताना मधेच थांबवून त्यावर लिहू शकतो व तिथल्या तिथे समजावून सांगू शकतो. आपण पूर्ण कम्प्युटर टच स्क्रीन मोबाइल प्रमाणे डिजिटल पेनचा वापर करून वापरू शकतो. एखादे पुस्तक उघडून त्यावर हाय लाइट करून दाखवू शकतो. अश्या अनेक गोष्टी करून शिकवणे अधिक परिणामकारक करू शकतो.
     ह्या स्मार्ट बोर्ड बरोबर त्याचे एक सॉफ्टवेअर येते ते वापरुन वर सांगितलेल्या गोष्टी आपण करू शकतो. आपण आपले पूर्ण लेक्चर सुदधा रेकॉर्ड करून सेव्ह करून ठेऊ शकतो, एखादे गणित सोडूवून झाल्यावर ते रेकॉर्ड करून रीविजन म्हणून किंवा ऑफ पीरियडला मुलांना दाखवू शकतो. आपल्या मोबाइल वरील शैक्षणिक गेम्स आपण स्मार्ट बोर्ड वर मुलांना खेळायला देवू शकतो. असे अनेक फायदे टच स्क्रीन बोर्ड चे आहेत. इंटरनेट वर या बोर्ड साठी अनेक इंटर अॅक्टिव सॉफ्टवेअर व टूल्स फ्री मिळतात.
     टच स्क्रीन स्मार्ट बोर्ड दोन प्रकारात येतात एक पेन टच व दूसरा फिंगर टच. पेन टच बोर्ड फक्त डिजिटल पेन ने वापरता येतो तर फिंगर टच बोर्ड आपण मोबाइल सारखे बोटांनी टच करून पण वापरता येतो. स्मार्ट बोर्ड घ्यायचे असतील तर  Promethean व Smart Technologies या दोन कंपांनीचेच घ्या. दुसर्‍या चीनी कंपनीचे घेऊ नका. या कंपनीचे पेन टच स्मार्ट बोर्ड साधारण 45000/- रुपयांना मिळतात तर फिंगर टच बोर्ड 55000/- रुपयांना मिळतात. या बोर्ड च्या अधिक माहिती साठी या वेबसाइटला भेट द्या.  www.prometheanworld.com
https://www.prometheanworld.com/products/interactive-whiteboard-systems/
https://home.smarttech.com/
 यू ट्यूब वर याचे विडियो तुम्ही बघू शकता.
Youtube Video Link 1- https://www.youtube.com/watch?v=NZk2ty-HfgE
Youtube Video Link 2- https://www.youtube.com/watch?v=_y_kS9d_Vgs
PDF सोबत ब्रोशर जोडले आहे.


Dealer address for Smart Borads
Solapur Dealer - J.M Distributors, G-1/24, Damani Shopping Complex, Near Datta Chowk, Solapur -7 Contact no. 0217-2623521/2724365 Email-jm_distributor@yahoo.co.in
Pune Dealer 1 ClariSmart Technologies No-3, Shrey Apartment, Prabhat Road, Erandwane, Pune – 411004 Contact no. 020-25435662,   70301 00022
Pune Dealer 2   Systani Automation Pvt. Ltd   Office No-7,Shrirang House,Behind Standard Chartered Bank, J.M.Road, Shivajinagar, Pune. Contact no. +91020 65248088, +919372218088

Mumbai Dealer – Central Trading Company 30 ABC, 1st Floor, Wadia Building, 9/B Cawasji Patel Street, Near Mahesh Lunch Home,  Fort, Mumbai – 400001 Contact no. + 9122-38595205

Delhi Dealer – Smart Technologies, Level 2, Elegance Tower Jasola Business District, New Delhi, 110025  India Contact- 9953555284
सौजन्य – Synapse E-Learning, Solapur
Prop. Laxman Patil Mobile no. 8446096789, 7038962705,
Website - synapse-elearning.webs.com E-mail- synapse.elearning@gmail.com
वेबसाइट अडड्रेस अगोदर www किंवा http टाकू नका. अडड्रेस बार मध्ये डायरेक्ट टाइप करा किंवा कॉपी पेस्ट करा.  ई-लर्निंग क्लासरूम विषयी कोणतीही शंका असेल माहिती हवी असेल तर वरील मोबाइल नंबर वर संपर्क करा. मोफत मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद
श्रीपाद सुरवसे सर, श्री दत्त प्रशाला, सोलापूर, मोबाइल न. 9850509315
E-mail – shripad.surwase@gmail.com

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

  #####################################################################

ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन लेखमाला 17
(3) टच स्क्रीन प्रोजेक्टर (इंटरअॅक्टीव प्रोजेक्टर)
   आपण आता लेखमाला 16 मध्ये स्मार्ट बोर्ड विषयी माहिती पहिली आता स्मार्ट बोर्ड पेक्षा ही आधुनिक असे तंत्रज्ञान आपण पाहूया ते म्हणजे टच स्क्रीन प्रोजेक्टर.
टच स्क्रीन प्रोजेक्टर: हा प्रोजेक्टर सगळ्या प्रोजेक्टर पेक्षा एकदम लेटेस्ट आहे. याला इंटरअॅक्टीव वॉल (भिंत) असेही म्हणतात. हा खूप advanced आहे. याची स्पेशलिटी म्हणजे हा टच स्क्रीन आहे. हो जादु सारखे याचे फीचर्स आहे. हा टच स्क्रीन आहे म्हणजे हा आपल्या भिंतीलाच टच स्क्रीन करतो. म्हणजे याचा फोकस किंवा स्क्रीनचा प्रकाश जेवढ्या भागावर पडेल तेवढा भाग टच स्क्रीन होतो. म्हणजे चक्क आपल्या मोबाइल सारखा टच स्क्रीन. या प्रोजेक्टर मध्ये दोन मॉडेल आहेत. एक पेन टच व दूसरा फिंगर टच म्हणजे बोटांनी सुद्धा आपण भिंतीवर लिहू शकतो टच करू शकतो मोबाइल सारखे ? ही आहे की नाही टेक्नॉलजी ची जादू ! अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे हा प्रोजेक्टर अल्ट्रा शॉर्ट थ्रो (Ultra Short Throw) आहे. म्हणजे हा अगदी भिंतीला चिकटून 1 फुट अंतरावर बसतो. शिकवताना अजिबात डोळ्यावर प्रकाश येत नाही. आपण आपला  5 इंचचा टच स्क्रीन मोबाइल 20000 रुपयांना घेतो मग 4 x 6 फुट टच स्क्रीन करायला किती खर्च येत असेल पण हा प्रोजेक्टर त्या मानाने स्वस्त येतो म्हणजे 100000 रुपयात येतो (1 लाख रुपये). टच स्क्रीन स्मार्ट बोर्ड वापरताना प्रोजेक्टर साधा वापरावा लागतो त्यामुळे यावर शिकवताना शिक्षकांच्या थेट डोळ्यावर प्रकाश पडून डोळ्याला त्रास होऊ शकतो म्हणून हा प्रोजेक्टर ई-लर्निंग क्लासरूम साठी सर्वात उत्तम आहे. तसेच स्मार्ट बोर्ड हा खूप जड असतो, तो बसवणे खूप अवघड जाते. तसेच स्मार्ट बोर्ड खोडकर विद्यार्थी करकटक किंवा क्मपास, दगड यासारख्या वस्तूंनी ओरखडा केला तर पूर्ण स्मार्टबोर्ड सीएचसी खराब होतो तो दुरुस्त होत नाही किंवा दुरुस्त करायचा असेल तर पाठवणे अवघड आहे. स्मार्ट बोर्ड च्या मानाने हा प्रोजेक्टर हलका आहे मुले याला काही करू शकत नाहीत. तसेच दुरूस्ती करणे सोपे आहे. ह्या टच स्क्रीन प्रोजेक्टर बरोबर एक डिजिटल पेन व एक वेगळे सॉफ्टवेयर येते याच्या सहयाने भिंतीवर, नॉर्मल व्हाइट बोर्ड वर लिहिता येते, चित्रे काढता येते, चित्रांवर लिहिता येते, विडियो वर लिहिता येते, शैक्षणिक सॉफ्टवेअर वर लिहिता येते. भोमितिक आकृत्या काढता येतात. मोबाइल वरील गेम्स खेळता येतात. पूर्ण कम्प्युटरच टच स्क्रीन होतो. हा प्रोजेक्टर मोठ्या टेबल वर ठेऊन गेम्स खेळता येतात. या प्रोजेक्टर चे सर्व फीचर्स स्मार्ट बोर्ड सारखेच आहेत. इंटरनेट वर खूप लहान सॉफ्टवेअर आहेत जे आपण या टच स्क्रीन प्रोजेक्टर साठी वापरू शकतो. हा प्रोजेक्टर Epson कंपनीने प्रथम बाजारात आणला. या प्रॉजेक्टर चे दोन मोडेल आहेत Epson EB 575 Wi हे मोडेल पेन टच आहे तर दूसरा मोडेल Epson EB 595 Wi हे मोडेल फिंगर टच आहे. पेन टच मोडेल ची किमत 1,20,000/- रुपये आहे व फिंगर टच मोडेल ची किमत 1,80,000 रुपये आहे. या प्रॉजेक्टर च विडियो खूप सुंदर आहे यूट्यूब वर नक्की पहा खालील लिंक वर
https://www.youtube.com/watch?v=Os_1qh_dcIw
व प्रॉजेक्टर चे ब्रौचर सोबत जोडत आहे. याची अधिक माहिती Epson च्या वेबसाइट वर ही मिळेल. किंवा Epson Interactive Projector असे गूगल वर व Youtube वर सर्च करू शकता
https://epson.com/brightlink-education-interactive-projectors
PDF सोबत ब्रोशर जोडले आहे.
हा प्रोजेक्टर तुम्हाला बघायचा  असेल तर तो तुम्हाला रयत शिक्षण संस्थेची शाळा , न्यू इंग्लिश स्कूल, कुरूल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येते बघायला मिळेल. ही शाळा अवश्य पहा तिथे मराठी मीडियम असून सुद्धा असे 8 प्रोजेक्टर बसवलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रात इथे हा प्रोजेक्टर पहिल्यांदा बसवला आहे.  जर हा प्रोजेक्टर जिल्हा परिषद शाळेसाठी पाहिजे असेल तर स्वस्त दरात मिळेल. हा प्रोजेक्टर तुम्हाला तुमच्या शहरातील Epson कंपांनीच्या अधिकृत डीलर कडे मिळेल. किंवा
Veetrag Computers, Sangali, 9689891774
Synapse E-Learning, Solapur
सौजन्य – Synapse E-Learning, Solapur
Prop. Laxman Patil Mobile no. 8446096789, 7038962705,
Website - synapse-elearning.webs.com E-mail- synapse.elearning@gmail.com
वेबसाइट अडड्रेस अगोदर www किंवा http टाकू नका. अडड्रेस बार मध्ये डायरेक्ट टाइप करा किंवा कॉपी पेस्ट करा.  ई-लर्निंग क्लासरूम विषयी कोणतीही शंका असेल माहिती हवी असेल तर वरील मोबाइल नंबर वर संपर्क करा. मोफत मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद
लेखक - श्रीपाद सुरवसे सर, श्री दत्त प्रशाला, सोलापूर, मोबाइल न. 9850509315
E-mail – shripad.surwase@gmail.com

  $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन लेखमाला 18
(3) टच स्क्रीन इंटरअॅक्टीव एलईडी डिसप्ले
         ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन लेखमाला 18 मध्ये आपण आधुनिक अश्या टच स्क्रीन प्रोजेक्टर ची माहिती बघितली. आता आपण त्याचाही पेक्षा आधुनिक असे तंत्रज्ञान पाहूया ते म्हणजे टच स्क्रीन इंटरअॅक्टीव एलईडी डिसप्ले. मागील लेखात आपण पहिले कि स्मार्ट बोर्ड साठी प्रोजेक्टर ची गरज असते त्याशिवाय तो काम करू शकत नाही. पण प्रोजेक्टर वापरला कि डोळ्याला त्रास होणारच. तसेच टच स्क्रीन प्रोजेक्टर मध्ये हि टच स्क्रीन प्रोजेक्टर आलाच. नेमके हेच लक्षात घेऊन टच स्क्रीन इंटरअॅक्टीव एलईडी डिसप्ले बाजारात आला आहे, यामध्ये स्मार्ट बोर्ड टर आहे पण याला प्रोजेक्टर ची गरज नाही. टच स्क्रीन इंटरअॅक्टीव एलईडी डिसप्ले म्हणजे काय तर एक मोठा टच स्क्रीन टीवी TV. याचे सर्व काम हे स्मार्ट बोर्ड सारखेच असते पण याला प्रोजेक्टर लागत नाही. या एलईडी डिसप्ले तुम्ही लिहू शकता, चित्रे काढता येते, चित्रांवर लिहिता येते, विडियो वर लिहिता येते, शैक्षणिक सॉफ्टवेअर वर लिहिता येते. भोमितिक आकृत्या काढता येतात. मोबाइल वरील गेम्स खेळता येतात. पूर्ण कम्प्युटरच टच स्क्रीन होतो. स्मार्ट बोर्ड आणि टच स्क्रीन प्रोजेक्टर वापरण्या पेक्षा याचे फायदे खूप आहेत. एक म्हणजे डोळ्याला त्रास होत नाही, दुसरे म्हणजे हा स्क्रीन एका stand सोबत येतो. या stand ला चाके असतात, यामुळे हा एका जागेवरून दुसर्या जागी हलवता येतो. प्रोजेक्टर नसल्यामुळे त्याचा खरेदीचा व दुरुस्तीचा खर्च वाचतो. पण या एलईडी डिसप्ले किंमत खूप जास्त आहे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे याची किंमत 2,50,000 ते 3,00,00 रुपयापर्यंत आहे. हि किमत सध्या तरी आपल्या शाळांना परवडणार नाही. पण हळु हळू तंत्रज्ञान स्वस्त होत असतेच. हा एलईडी डिसप्ले SmartTech,  Promethean, Specktron, TouchitTechnologies, TouchBoards या कंपनीने बाजारात आणले आहेत. हे एलईडी डिसप्ले फिंगरटच तसेच पेनटच असतात.



याचा व्हिडीओ तुम्ही youtube वर पाहू शकता या लिंक वर
https://www.youtube.com/watch?v=Sj8vlMcvfzw
https://www.youtube.com/watch?v=lnkAzmVTFXU
https://www.youtube.com/watch?v=cT3kbBaRPxg
तसेच टच स्क्रीन इंटरअॅक्टीव एलईडी डिसप्ले चे विविध मोडेल्स ची माहिती खाली दिलेल्या वेबसाईट लिंक वर पाहू शकता
https://education.smarttech.com/en/products/smart-board-interactive-flat-panels
http://www.specktron.com/uae-en/products/interactive-led-displays
http://touchittechnologies.com/
http://www.touchboards.com/interactive-whiteboards-screens/interactive-lcdled/
https://www.prometheanworld.com/products/interactive-flat-panels/
सोबत ब्रोशर पाठवत आहे PDF फाईल मध्ये...
टच स्क्रीन इंटरअॅक्टीव एलईडी डिसप्ले चे अधिकृत डीलर

ClariSmart Technologies
No-3, Shrey Apartment, Prabhat Road,
Erandwane, Pune – 411 004
Cell: +91 70301 00022
Landline: 020 - 25435662
Email: admin@esmartschools.in

सौजन्य – Synapse E-Learning, Solapur 
Prop. Laxman Patil Mobile no. 8446096789, 7038962705,
Website - synapse-elearning.webs.com E-mail- synapse.elearning@gmail.com
वेबसाइट अडड्रेस अगोदर www किंवा http टाकू नका. अडड्रेस बार मध्ये डायरेक्ट टाइप करा किंवा कॉपी पेस्ट करा.  ई-लर्निंग क्लासरूम विषयी कोणतीही शंका असेल माहिती हवी असेल तर वरील मोबाइल नंबर वर संपर्क करा. मोफत मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद
लेखक - श्रीपाद सुरवसे सर, श्री दत्त प्रशाला, सोलापूर, मोबाइल न. 9850509315 
E-mail – shripad.surwase@gmail.com

 

 

 

 ई-लर्निंग क्लासरूम मार्गदर्शन लेखमाला 21
(5) क्रोमकास्ट किंवा मीराकास्ट  ( ChromCast or MiraCast )
      तुमचा मोबाईल म्हणजे एक छोटा कॉम्पुटर आहे. आज Android मोबाईल मुळे भरपूर शैक्षणिक अॅप्स, गेम्स सहज उपलब्ध झाले आहेत. तुम्हाला हि असे वाटत असेल कि आपली मुळे जी शैक्षणिक गेम्स घरी मोबाईल वर खेळतात ती शाळेतल्या मुलांना हि दाखऊन त्यानाही शिकवता आले तर किती बरे होईल. तर आता ते शक्य झाले आहे तंत्रज्ञानामुळे फक्त एक Pen drive सारखे उपकरण    डिव्हाईस वापरून त्याला क्रोमकास्ट म्हणतात. क्रोमकास्ट प्रथम गुगल ने बाजारात आणला. गुगल ने खरे तर क्रोमकास्ट आपल्या मोबाईल वरील फोटो, व्हिडिओ LED टीव्ही वर बघण्या साठी बाजारात आणले होते, कारण आपण जो टीव्ही अगोदर घेतला आहे तो स्मार्ट नसतो. आता नवीन आलेले स्मार्ट टीव्ही हे  Android असतात. म्हणजे या मध्ये आपला मोबाईल टीव्ही ला वायरलेस ने जोडता येतो व आपली मोबाईल स्क्रीन त्यावर दिसते. सेम अशीच सुविधा हे क्रोमकास्ट देते. थोडक्यात काय तर आपण आपला वापरताना मोबाईल स्क्रीन टीव्ही किंवा प्रोजेक्टर दिसते. म्हणजे आपला मोबाईल टीव्ही ला किंवा प्रोजेक्टर ला वायरलेस ने जोडून त्याची स्क्रीन आहे तशी प्रोजेक्टर वर मोठी दिसते. यामुळे आपल्या मोबाईल वरील फोटो, व्हिडीओ, अॅप्स, गेम्स प्रोजेक्टर वर मोठ्या आकारात दाखवणे शक्य आहे. याचाच वापर आपण शैक्षणिक अॅप्स, गेम्स विद्यार्थ्यांना दाखवून शिकवण्या करिता करू शकतो. आता बरेच शैक्षणिक सोफ्टवेअर Android  वर चालतात, तसेच आपल्याला इंटरनेट वरून माहिती, फोटो लगेच दाखवता यते, YouTube वरील शैक्षणिक व्हिडिओ, अॅनिमेशन लगेच किंवा डाऊनलोड करून दाखवता येते.  हे डिव्हाईस वापरण्यासाठी तुमच्या प्रोजेक्टर ला HDMI व USB कनेक्शन पोर्ट असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या मोबाईल मध्ये कंपनी कडूनच Screen Mirror, Screen Cast, Smart View असे फंक्शन असणे आवश्यक आहे. हे डिव्हाईस वापरून तुम्ही तुमच्या मोबाईल मधील शैक्षणिक चित्रे, फोटो, व्हिडीओ तसेच शैक्षणिक अॅप्स आणि गेम्स प्रोजेक्टर वर विद्यार्थ्यांना दाखवू शकता. नुकत्याच आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय (GR) दि. 09/01/2017 जलद शैक्षणिक महाराष्ट्र मध्ये या क्रोमकास्ट उल्लेख केलेला आहे. हे क्रोमकास्ट गुगल कंपनी चे 6500 रुपयांना मिळते, व इतर कंपनीचे 1800 ते 2000 रुपयांना मिळते.

       हे क्रोमकास्ट मीराकास्ट या नावाने सीनप्स ई-लर्निंग, सोलापूर या कंपनीकडे 1800 रुपयांना मिळते. तुम्हाला याचा फ्री डेमो बघायचा असल्यास तो सोलापूर मध्ये बघता येईल. जर हे मीराकास्ट तुम्हाला मागवायचे असल्यास Synapse E-Learning च्या या whatsapp नंबर वर काल करा किंवा मेसेज पाठवा 7038962705.
अधिक माहिती साठी व फ्री डेमो साठी या पत्यावर भेट द्या
सीनप्स ई-लर्निंग,
विमानतळ गेट समोर, हत्तुरे नगर, होटगी रोड,
सोलापूर, महाराष्ट्र पिन - 413003
मोबाईल नंबर- 7038962705

Synapse E-Learning,
In front of Airport Gate, Hatture Nagar, Hotagi Road,
Solapur, Maharashtra Pin 413003 
Mobile no. 7038962705, 8446096789
Website - synapse-elearning.webs.com
E-mail- synapse.elearning@gmail.com

या लेखाच्या PDF फाईल सोबत मीराकास्ट चे ब्रोशर आहे. यामध्ये सर्व माहिती आहे.

सौजन्य – Synapse E-Learning, Solapur

वेबसाइट अडड्रेस अगोदर www किंवा http टाकू नका. अडड्रेस बार मध्ये डायरेक्ट टाइप करा किंवा कॉपी पेस्ट करा.  ई-लर्निंग क्लासरूम विषयी कोणतीही शंका असेल माहिती हवी असेल तर वरील मोबाइल नंबर वर संपर्क करा. मोफत मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद
श्रीपाद सुरवसे सर, श्री दत्त प्रशाला, सोलापूर, मोबाइल न. 9850509315
E-mail – shripad.surwase@gmail.com

 

 

 

 

शालेय विभाग



शालेय विभाग माहिती  

शा.पो.आ. Calculatar App

Digital Class साठी माहिती 

शालेय अभीलेखे

गणितातील गमतीजमती

                   

इथे Click करा


No comments:

Post a Comment